घाटंजी दि ९ :-तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या मंगी या गावी विमल कोंडीबा धुमाळे वय ६२ ह्या अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या त्यांना मुलबाळ नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या.
The villagers of Mangi are saddened by the death of the village aunt
त्या फक्त अंगणवाडी मदतनिस असल्यातरी मदतीची भावना तिच्या मध्ये एवढी होती की अंगणवाडी शाळेचा परीसर स्वच्छ करून अंगणवाडी ताई व शिक्षक येण्या अगोदर गावातील प्रत्येक मुलामुलींना बोलावून आणायच्या लहानांना कडी खांद्यावर घेऊन यायच्या अतिशय प्रेमळपणा असल्याने त्या गावच्या मावशी म्हणून प्रख्यात झाल्या.कोणताही शासकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम असो चहापाणी नाश्ता ची जबाबदारी संपूर्णपणे विमलताई च्याच खांद्यावर अशा विमलताई चार आज दि.९ला अल्पशा आजाराने निधन पावल्या.तिच्या निधनाने जणुकाही गावची मावशी च हरविल्याचे दुःख गावकऱ्यात पाहावयास मिळाले अशा गावच्या मावशीला जाति धर्माचा विचार न करता फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजतगाजत शेवटचा निरोप गावकऱ्यांनी देवुन सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 comments:
Post a Comment