Ads

घाटंजी शहरातील नागरिकांचा मी नेहमी ऋणी राहील -शैलेश ठाकूर I will always be indebted to the citizens of Ghatji city - Shailesh Thakur

घाटंजी तालुका प्रतिनिधी:- घाटंजी शहरातील मित्र परिवाराच्या वतीने नुकताच घाटंजी शहराचे माजी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांचा वाढदिवस शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला शैलेश ठाकूर यांची राजकीय व सामाजिक कारकिर्द पाहीली असता कोणताही राजकीय वारसा नसताना गेल्या कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पकड कायम ठेवण्याची किमया या नेतृत्वाने कायम ठेवली आहे. 
I will always be indebted to the citizens of Ghatji city - Shailesh Thakur
भले भले आले, आणि संपुन गेले पण गोरगरिबांच्या हक्कासाठी सातत्याने लढत राहणे प्रसंगी त्यांच्या साठी स्वतः वर पोलीस केसेस लावून घेणे या करिता तळमळ असावी लागते. शैलेश ठाकूर यांची राजकीय आणि सामाजिक चळवळ 1993 मध्ये सुरू झाली अतोनात हाल अपेष्टा सहन करत हा कार्यकर्ता उभा राहिला, सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे मावळे जमा केले आणि त्या वेळच्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या जुलमी राजवटी विरूद्ध रान उभे केले. हि लढाई सोपी नव्हती  प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देताना अनेक वेळा या वादळाला तुरूंगात जावे लागले, पण या गड्याने गरिबांच्या हक्कासाठी लढणे सोडले नाही. शहरातील नागरिक खासगीत चर्चा करतात,  हा माणूस शब्दाला पक्का आहे, म्हणून नागरिक त्यांना शहरामध्ये एकहाती सत्ता देतात,हा विश्वास म्हणजेच राजकीय व्यक्ती साठी मोठी पावती असते. 
   शैलेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले त्या साठी शुभम उदार, मयुर बिसमोरे, राहुल गायकवाड, पिंटू राऊत, विजय राऊत, व दुर्गा उत्सव मंडळ घाटी यांनी या करीता पुढाकार घेतला होता. तसेच वसंत नगर, इंदिरा आवास येथील महिलांनी वाढदिवस साजरा केला यावेळी शैलेश ठाकूर मित्र मंडळाने साडीचोळी वाटप करून महिलांना अनोखी भेट दिली. सय्यद मुजीप यांनी  पारवा पाँइंट, सय्यद वसिम यांनी वाढदिवस साजरा केला, त्याच प्रमाणे विनोद महाजन, पोलिस स्टेशन चौक येथे कज्जुम कुरेशी यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. नेहरू नगर मधील विलास बोरकर, दिपाली बोरकर, शंकर भोयर, यांच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. या करीता शहरातील नागरिकांचे शैलेश ठाकूर यांनी आभार व्यक्त करून मी तुमचा कायम ऋणी राहील असे म्हटले आहे. नागरीकांचे एवढे प्रचंड प्रेम मिळणे सोपे नसते, त्या साठी नेतृत्वालाही त्या विश्वासाने नागरिकांशी वागावे लागते असेच म्हणावे लागेल
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment