वरोरा: सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे, धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु काहीजण याला अपवादही आहेत, काही तरुण सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव साधुन सामाजिक उपक्रम राबवत असतात. असाच एक उपक्रम निरज रमेश चौधरी या तरूणाने नुकताच राबवला आहे.
The youth's birthday was celebrated by planting trees
वरोरा शहरातील बावने लेआऊट, आनंदवन, बोर्डा, सिद्धकला लाॅन येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर या भागात असलेल्या पहिल्या काही झाडांना आणि निरज चौधरी यांनी लावलेल्या झाडांना पाणी देण्यात आले.
निरज चौधरी व संपूर्ण कुटुंबियांना वृक्षारोपणाची आवड असून त्याचे महत्त्व माहीत आहे.
अश्या प्रकारे एकाच युवा पिढी ने एकत्रीत येऊन सुंदर असा हा उपक्रम करून “वृक्षारोपण आज काळाची गरज आहे, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे असा संदेश दिला". ह्यावेळी नीम, गुलमोहर, रातराणी, लावण्यात आली. यावेळी निरज चौधरी फीरदोस खान, समीर कोराम, गोपाल गायकवाड, मकरंद बदलीवार स्वप्नील कोराम, इत्यादी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment