सादिक थैम वरोरा: तालुक्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने वरोरा, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव, चिमूर मार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प पडलेली आहे..
Life of rural people disrupted by heavy rains.
अतिवृष्टी पावसामुळे भद्रावती चंदनखेडा,शेगाव,मुख्य मार्गावर असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठील सोयाबीन, तूर ,कपास शेती पिकांचे नुकसान झाले ईरई नाल्याचे पाणी अर्जुनी तुकुम, वायगाव,कोकेवाडा, आष्टा, चंदनखेडा, गावातील पुलावरून शिरले असून शेतकरी, रुग्ण नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून जनजीवन विस्कळीत झालेली आहे, तर वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरातील ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले असून जनावराच्या चाराचे मोठे नुकसान झालेले आहे..
ग्रामीण भागातील दवाखान्यात जाणारे अनेक नागरिक दोन्ही बाजूने अडकलेले होते नदीकाठील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची दखल घेण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
अनेक वर्षापासून अर्जुनी तुकुम रस्त्यावर असलेला पूलाची उंची वाढवण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत असून याकडे वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पावसाळ्यात शिक्षण, आरोग्य, दळणवळण आदी समस्येला जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.....
0 comments:
Post a Comment