तालुका प्रतिनिधी (भद्रावती) जावेद शेख - भद्रावती नगरपालिका शेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील बाजार वॉर्ड, किल्लावॉर्ड मधील माहुरे बुट हाऊस ते पारेलवार दुध डेअरी ते विठ्ठल मंदिर ते पुरातन किल्ल्या जवळील राऊत यांचे घर व पारेलवार दुध डेअरी ते जुना पोलिस स्टेशन जवळील गनगंम वार किराणा दुकान तसेच किल्लावॉर्ड येथील अविनाश राऊत ते कन्नमवार यांचे घर पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे व रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक (गट्टू) लावणे या कामा करिता ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून मंजुर करण्यात आलेला आहे.
या कामालांजिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी झालेली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होणार आहे. सदर रस्त्याकरिता भद्रावती नगरपालिकेचेमाजी उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ८ चे माजी नगरसेवक प्रफुल चटकी यांनी दिनांक ४ मार्च २०२४ ला महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर कामरीता ५० लाख रुपयांची मागणी केली व पाठपुरावा केला परिणामी दिनांक ७ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार वैशिष्टपूर्णयोजने अंतर्गत या कामाकरीता शासनाकडून ५० लाख रुपये मंजूर केलेले आहे.
प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक यांनी रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल बाजार वॉर्ड व किल्ला वॉर्ड येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
0 comments:
Post a Comment