जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-तालुक्यातील मांगली येथील विवेकानंद हायस्कूल समोरून शेतशिवारात जाणारा रस्ता या रस्त्यावरून अवैधरित्या रेती ची तस्करी मोठ्या प्रमाणात दिवस व रात्र सुरू राहते रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे
Terrible condition of the road due to transportation of illegal sand
. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे तथा शेती उपयोगी वस्तूंची वाहतूक करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आळा घालून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून तो शेतकऱ्यांना ये-जा करण्यास योग्य करावा अशी मागणी मांगली येथील शेतकऱ्यांनी भद्रावती तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते तथा इतर आवश्यक सामान शेतापर्यंत न्यावे लागते. विवेकानंद हायस्कूल पासून शेतशिवारात जाणारा रस्ता या रस्त्यावरील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अत्यंत खराब झाला असल्याने या रस्त्यावरून बैलबंडी व इतर सामान शेतापर्यंत नेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित योग्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. हा रस्ता शासनाकडून मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी निवेदन सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले आहे.
0 comments:
Post a Comment