चंद्रपुर :-धोपटाळा येथील काही युवक मद्य सेवन करून काल दि 3 जूनला रात्री 11 वाजता येणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची वाट रोखून धरतात दरम्यान त्या युवकांची ट्रॅक्टर चालकांशी बाचाबाची होऊन दरम्यान झालेल्या दगडफेकीत एका श्रमिका चा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 3 जुलैला रात्री 11 वाजताच्या दरम्यान घडली आहे .
Unfortunate death of stone pelted tractor laborer;
ते युवक ट्रॅक्टर मालकाकडून ५० हजार रूपये खंडणीची मागणी करतात. अशातच ट्रॅक्टर मालक ती मागणी फेटाळतो व त्यानंतर तो युवकांचा घोळका त्या ट्रॅक्टर वर चढून जातो. त्यांच्याच शाब्दिक चकमक उडते आणि हातापायी होते.
अशातच एक जण ट्रॅक्टरची चाबी काढून घेतो व ट्रॅक्टर मालक आपल्या वडिलांना बोलावून ट्रॅक्टर डायरेक्ट करून राजूऱ्याच्या दिशेने ट्रॅक्टर पळवितो. परंतु अचानक तोच युवकाचा घोळका धोपटाळा कॉलनी चे एटीएम समोर येऊन बांबू व दगड घेऊन त्या ट्रॅक्टर वर दगड फेक करतात. त्या दगडफेकी मध्ये सोनिया नगर वॉर्ड राजुरा येतील रहिवासी असलेल्या मोहम्मद नावाच्या होतकरू श्रमिकाच्या छातीला दगड लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. सदर घटना मन हेलावणारी असून पोलीस विभागाकडून हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment