Ads

रस्त्यावरील उडान पुलाच्या मलब्यामुळे विजासन- कुनाडा रस्ता चिखलमय.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती शहरातील विंजासन रेल्वे गेट जवळ उडानपुलाचे काम सुरू आहे. सध्या सदर काम रखडल्यामुळे रेल्वे गेट जवळ चिखलाचे साम्राज्य पसरले, यामुळे या भागातील वाहतूक प्रभावीत झाली आहे.
Vijayasan-Kunada road muddy due to the debris of Over bridge on the road.
उड्डाणपूल तयार करीत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर या भागातील जमिनीचा विषय शासनाकडून अद्याप क्लियर करण्यात आला नसल्याने सदर काम रखडले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र काम रखडले असले तरी नागरिकांची वाहतुकीची समस्या कंपनीकडून लागलीच दूर करून त्यांना सुविधा देण्यात येईल असे सांगण्यात आले. आज रात्रोला हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी काही काळ बंद करण्यात आला होता.सदर रेल्वे गेट जवळ नाला आहे पावसाची पाणी इतरत्र पसरून या भागात सर्वत्र चिखल झाला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर येऊन हा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे कुनाडा, ढोरवासा, चारगाव व माजरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. पुरामुळे या भागात सर्वत्र चिखल पसरलेला असल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. नाला आणि आजूबाजूला असलेला चिखलमय भाग यामुळे वाहन स्लिप होऊन या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता बळवली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी योग्य करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.
जमिनीच्या या भागाचा विषय उपविभागीय अधिकाऱ्याकडे असुन अद्याप तो क्लीअर करण्यात आलेला नसल्याने नागरीकांना त्रास होत आहे.मात्र नागरीकांच्या समस्या दुर करण्यासाठी कंपणी कटीबद्ध असुन वेळोवेळी या रस्त्यावर नागरीकांना सुविधा पुरविण्यात येतील.
तूसिफ पटेल
व्यवस्थापक ,एम आर आय डी सी एल प्रोजेक्ट विजासन .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment