सादिक थैम वरोरा: येथील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाशी संबंधित आरोपींना आज येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी होत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांने त्यांना न्यायालयात नेणाऱ्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात आज वरोरा बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु काल रात्रीच आरोपींना पोलिसांनी अटक केल्यामुळे आज बंदच्या ऐवजी शहरातील गांधी चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा निषेध मोर्चा प्रमुख मार्गाने फिरत गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. यात शहरातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चात महिलांची संख्या बरीच होती. मात्र वरोरा बंदच्या आवाहनामुळे शहरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या.
आज दुपारी आरोपींना येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींतर्फे नागपूर येथून आलेल्या वकिलांनी आरोपींची बाजू न्यायालयासमोर मांडली असता न्यायालयाने त्यांना 13 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनवल्यामुळे त्यांची चंद्रपूर येथे तुरुंगात रवानगी करण्यात आली. यावेळी त्यांना चंद्रपूर येथे नेणारे वाहन न्यायालयाच्या बाहेर निघत असतानाच संतप्त नागरिकांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना आमच्या हवाली करा असे त्यांचे म्हणणे होते.
या प्रकरणासंबंधात राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या सदस्यांचे एक पथक घटनेच्या चौकशीसाठी वरोरा येथे आज दुपारी आले.आयोगाच्या पथकाने येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांची भेट घेतली व याबाबत पीडीतेला योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांच्याशी चर्चा केली.
येथील मिलन चौकातील समाजभवनात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हातीबेडे यांनी मुली कोणत्याही समाजाच्या असो, परंतु त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजाने अशा पिडीतांच्या मागे उभे राहून आरोपींना कडक शासन होईल यासाठी प्रयत्न करावे असे उद्गार काढले.
राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या पथकात आयोगाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के एम बेरीया व सारंग सातपुते, राष्ट्रीय महासचिव गौरीशंकर ग्रावकर, राष्ट्रीय सचिव राजू समुंद्रे, जिल्हा अध्यक्ष दिलीप हजारे, जिल्हा सल्लागार नंदलालजी मलिक यांचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment