भद्रावती जावेद शेख :-चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर ते बल्लारपूर मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता तसेच मुख्य बायपास रोडवरील राजीव गांधी अभियांत्रिक महाविद्यालय समोरून जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक किरकोळ अपघात झालेले आहेत. या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ रहात असून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तसेच अन्य विद्यार्थी या रस्त्यावरून आवागमन करीत असतात.
मात्र खराब रस्त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर दोन्ही रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रतिनीधी अनुभव सुनील नामोजवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन सादर करतांना अनुभव नामोजवार, यश पटले,साहिल तपासे,रचीत चावले,वैभव सातपुते, प्रणीत कवाडकर,सुमीत बनकर आदी विद्यार्थी ऊपस्थीत होते.
0 comments:
Post a Comment