सादिक थैम वरोरा: १७ऑगस्ट २०२४ रोज शनिवार ला स्थानिक कटारिया मंगल कार्यालय वरोरा येथे रोटरी क्लब वरोऱ्याचा वर्ष २०२४-२५ चा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात सम्पन्न झाला. या सोबतच रोटरी क्लब वरोऱ्याने ३२ व्या वर्षात पदार्पण केले.
नेतृत्व बदलाच्या उज्वल परंपरे ला समोर नेत या वर्षी मावळते अध्यक्ष रोटे. डॉक्टर सागर वझे यांनी आपली सुत्रे नविन अध्यक्ष रोटे बंडू देऊळकर यांचेकड़े सोपवलीत व नवनियुक्त सचिव म्हणून रोटे अभिजित मणियार यांनी, रोटे. मधुकर फुलझेले यांचे कडून सचिव पदाचा पदभार स्विकारला,तसेच रोटे दामोदर भासपाले यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डिस्ट्रि.३०३० चे रोटे डॉ विजय आइंचवार सर माजी अध्यक्ष रोटरी क्लब चंद्रपूर होते तर प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रि.३०३० चे माजी सह प्रांतपाल रोटे नितेश जयस्वाल तसेच रोटे.समीर बारई उपस्थित होते.तसेच रोटरी क्लबच्या विनंतीस मान देऊन प्रमुख अतिथी आपल्या लोकप्रिय खासदार मा.श्रीमती प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होत्या. सोबतच तथा रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष म्हणून हिमांशू कुकरेजा व सचिव म्हणून रोट्रॅक्ट मुनोत यांनी पदभार स्वीकारला .सुरवातीस पूर्वाध्यक्षानी गतवर्षी चा अहवाल वाचुन त्यांच्या नेतृत्वात क्लबने केलेल्या उत्तुंग कामांची ओळख करुन दिली तर नवीन अध्यक्ष रोटे बंडू देऊळकर यांनी आपल्या नवीन कार्यकारीनीची ओळख करुन दिली व सोबतच ३०३० नवीन सदस्य रोटरी क्लब वरोरा मध्ये सामील करुन घेतले व येणाऱ्या वर्षातील होऊ घातलेल्या लोकउपयोगी योजनांचे नियोजन सांगितले ,अध्यक्षीय भाषणातआद.आईंचवार सरांनी अमूल्य मार्गदर्शन क्लबला प्राप्त झाले तर रोटे नितेश जयस्वाल ( past AG)नी आईंचवार सरांची ओळख करून दिली,तसेच समीर बारई यांनी डिस्ट्रिक्ट व क्लबच्या संबंधावर प्रकाश टाकला व या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट च्या विविध योजनांची माहिती दिली,
कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन रोटे. हुजैफा अली यांनी आपल्या खुमारदार शैलीत केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव रोटे अभिजित मणियार यांनी केले,कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. या कार्यक्रमास रोटरी क्लब वरोरा , इंनर व्हील क्लब वरोरा .रोटरी क्लब चंद्रपुर ,वनी,भद्रावती,चिमूर चे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 comments:
Post a Comment