घाटंजी :-आज दि.१८रोजी तहसिल कार्यालय घाटंजी येथिल सभागृहात नोंदनी झालेल्या महिला बांधकाम कामगारांना किचन किटचे वाटपाचा कार्यक्रम आमदारांच्या हस्ते करण्यात आले परंतु सर्व लाभार्थी महिलांना सकाळी दहा वाजता बोलाविण्यात आल्याने आमदार महोदय उशिरा येवून भाषणबाजीत वैळेचे भान न ठेवता महिलांना ताटकळत राहावे लागले
Confusion over distribution of free cooking materials to construction workers
सदर कार्यक्रमात कोणतिही सुविधा नसल्याने महिलांना व त्यांच्या सोबत आलेल्या लहान मुलांना दिवसभर उपाशी राहावे लागले त्यात ह्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व आँनलाईन होत नसल्याने महिलांना दिवसभर उपाशी त्यात तहसील कार्यालय परीसरात सुट्टी असल्याने काही दुकानं बंद होती कसेबसे आँनलाईन संपले त्यात पावसाचा जोर आपला जिव मुठीत धरून हा डिनर सेट महिलांच्या हातात येण्यास रात्रीचे आठ वाजले दरम्यान महिला हि शिव्याशाप देत होत्या कि द्यायचेच असेल तर मानसन्मानाने द्यावे अन्यथा देवु नये.सदर कार्यक्रमाचे उदघाटन करून आमदार पसार झाले तेथे जबाबदार व्यक्तीचि वानवा पाहावयास मिळाली शेवटी डॉ विष्णू उकंडे दिलीप पवार वसंत मोरे,संजय गोडे, आकाश राठोड व ठाकरे यांनी पुढाकार घेवून वाटप करण्यात आले. असाच प्रकार नियोजनाच्या अभावामुळे घडत राहिला तर येणाऱ्या विधानसभा साठी ठिक नसल्याचे महिलां बोलत होते.
0 comments:
Post a Comment