चंद्रपुर :- सकाळी 9 वाजताच्या सुमारास मुलाला शाळेत नेत असताना अमीर ऑटोमोबाईल्स समोर अचानक मोकाट कुत्रा गाडीसमोर आल्याने प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बिडकर व त्यांच्या मुलाचा अपघात झाला मागे बिडकर यांच्या मुलाला कुत्रा चावला
Accident of Prahar district president and son
त्यामुळे त्यांनी नगर परिषद मध्ये आंदोलन केले तेव्हा नगर परिषद ने कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली पण काही कुत्रा प्रेमिने ही मोहीम थांबवली आणि पुन्हा आज मोकाट कुत्र्यामुळे बिडकर व त्यांचां 6 वर्षीय मुलगा गंभीर अपघातातून बचावले.सकाळी 9 वाजे दरम्यान नेहमी प्रमाणे सतिश बिडकर हे आपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना अमीर ऑटोमोबाईल्स समोर डीवायडर वरून कुत्र्याने उडी मारली असता टू व्हीलर च्या समोर कुत्रा अचानक आल्याने गाडी घेऊन मुलासहित रस्त्यावर कोसळले त्यात सतिश बिडकर यांचा हात फ्रॅक्चर झाला व पायाला गंभीर दुखापत झाली तर सुदैवाने मुलाला जास्त दुखापत झाली नाही या मोकाट कुत्र्यमुळे अनेकांचे जीव गेले तर अनेक जण गंभीर जखमी झाले यावर नगर परिषद ने तात्काळ कार्यवाही करायला पाहिजे असे बिडकर यांनी म्हंटले आहे
0 comments:
Post a Comment