सादिक थैम :-वरोरा माढेळी मार्गावर आज २६ ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या एका अपघातात वरोरा येथील एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला.
वरोरा येथील आंबेडकर चौक परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करणारे अनिल शंकरराव कोळसे वय 52 हे काही कामासाठी आपल्या दुचाकी एम एच ३४ ए जे ०८२१ क्रमांकाच्या यामाहा या दुचाकीने माढेळी वरून वरोरा ला येत होते. वरोरा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपती मंदिराजवळ आले असताना त्यांना आलेल्या फोननेच त्यांचा घात केला. मोबाईलवर आलेल्या फोनवर बोलत असताना त्यांचे दुचाकीवरील संतुलन बिघडले व ते रस्त्यावरील खड्ड्यात पडले. खड्ड्यात पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना जखमी अवस्थेत वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
या मार्गावरून सतत होत असलेल्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यानेच आज अनिल कोळसे यांचा जीव घेतला. या अवजड वाहनाबद्दल नागरिकात असंतोष असून या रस्त्याने होणारी ही अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0 comments:
Post a Comment