चंद्रपूर:-राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली या घटणेनी संपूर्ण राज्य हादरला सर्वत्र निषेध व आक्रोश सूरू असतांनाच परत काहिदिवसांपूर्वी नागभीड येथील एका मानसिक रुग्न असलेल्या महिलेंवर बलात्कार करून ती चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आली असून समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे
Give capital punishment to those murderers who rape the crazy woman and broadcast the video on the media
आपण या गुन्हेगारा विरुद्ध कठोर कारवाई करून यांना फासावर चढवावे ज्यामुळे अशा घटना पून्हा घडणार नाहीत आणि कुणी राक्षसीवृत्ती हिम्मत देखील करणार नाही यावर लवकरात लवकर ठोस पाउले उचलावी अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन करणार या आशयाचे निवेदन मनसेच्या महिला सेना चंद्रपूर माजी जिल्हाध्यक्षा सौ. सूनिता गायकवाड ,मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पना पोर्तलावार यांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे शुभम वांढरे, मंगेश धोटे, अर्चना आमटे, राज वर्मा, कुंताताई येरमुडे, सरला दुर्गे, निक्की यादव, उज्वल तेलतुमडे तथा मनसेचे कार्यकर्ते व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते..
0 comments:
Post a Comment