राजूरा :-आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा तथा आदर्श हायस्कुल व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने 39 वा नेत्रदान पंधरवडा व कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Promote the idea of eye donation. Shankar Burhan
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे या होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर बुऱ्हान, सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी ,प्रीझम भैसारे, नेत्र चिकित्सा अधिकारी, उप जिल्हा रुग्णालय राजुरा, राजकुमार आत्राम, कुष्ठरोग तंत्रज्ञ, राहुल गेडेकर, फिजिओथेरेपिस्ट, श्रेयश बुऱ्हान, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जानभूळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स च्या विध्यार्थीनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड कॅपटण रोशनी कांबळे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर यांनी केले. तर आभार जयश्री धोटे यांनी मानले. यावेळी शंकर बुऱ्हाण यांनी नेत्रदानाच्या संकल्पनेला लोकचळवळ करा. ती प्रत्येक व्यक्ती, समाजापर्यंत पोहचवून मरणोत्तर नेत्रदान करून मरावे परी कीर्ती रुपी उरावे असे आवाहन केले. मरणोत्तर नेत्रदाणासाठी इच्छापत्र भरून घेतले. चित्तेत टाकाल तर राख होईल, पुरून टाकल तर माती होईल, मृत्यूनंतर दान कराल नेत्राचे तर दोन जीवन सुखी होईल. नेत्रदाणासाठी कोणत्या व्यक्तीचे डोळे घेतले जात नाही व नेत्रदान कोण करू शकतो याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच राजकुमार आत्राम व राहुल गेडेकर यांनी कुष्ठरोग निर्मूलन बाबत सविस्तरपणे माहिती दिली. कुष्ठरोग म्हणजे काय, त्याची व्याप्ती, समस्या व उपाय यावर माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, रुपेश चिडे, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, रजनी पिदूरकर, प्राजक्ता साळवे, वैशाली चिमुरकर, मनीषा लोढे, माधुरी रणदिवे, किसन वेडमे, आदर्श हायस्कुलचे प्रशांत रागीट, भाग्यश्री क्षीरसागर, आशा बोबडे, अंजली कोंगरे आदींची उपस्थिती होती. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तसेच School Awarness program, CDCC, Leprosy and Lymphatic Filariasis यांचे सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment