जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती एरवी विद्युत प्रवाहाला अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणारे विद्युत कर्मचारी आपण नेहमीच पाहतो.मात्र याची भरपाई करीत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भद्रावती विज वितरण कंपणीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भद्रावती विज वितरण कंपणी कार्यालयाच्या प्रांगणात विवीध वृक्ष लाऊन वृक्षारोपण केले आहेत.
Plantation of trees in the office premises of the Electricity Distribution Company.
त्यांनी केवळ वृक्षारोपणच केले नाही तर लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याचा वसाही त्यांनी यावेळी घेतला आहे.यावेळी कार्यालयाच्या प्रांगणात फळे तथा फुलांचे विविध वृक्ष लाऊन त्यांनी देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.यावेळी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय कांबळे,शहर कक्षिचे सहाय्यक अभियंता सुमेध खनके,ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता जयप्रकाश लोणगाडगे,ग्रामीण व शहर कक्षाचे कर्मचारी व कंत्राटदार ऊपस्थीत होते.सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला कंत्राटदार पराग सावरकर, श्री बदखल, शाम गोवारदिपे, श्री लुले श्री बुटले आदिंनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment