चंद्रपूर :- राज्यभर शासन व प्रशासन विरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघाचे साखळी उपोषण चंद्रपूर बाबूपेठ येथील महावितरण कार्यालयसमोर विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहेत
Elgar of contract workers in front of Chandrapur Mahavitaran office
महानिर्मिती महापारेषण महावितरण या तिन्ही कंपनीतील ४२ हजार कंत्राटी कामगार विविध पदावर काम करत आहेत मात्र भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांच्यामार्फत संगनमताने कामगारांचे पिळवणूक होतात कामगारांना मोबदला व्यवस्थित न मिळणे अधिकाऱ्यांची विनाकारण मर्जी सांभाळणे तसेच पगारातील ठराविक रक्कम खंडणी स्वरूपात कंत्राटदारास मागणी करतात न दिल्या सदर कामगाराला कामावरून कमी करण्याची धमकी कंत्राटदाराकडून दिली जाते अशा प्रकारचे टांगती तलवार या कंत्राटी कामगारावर लटकत असून. हे हुकूमशाही कुठेतरी कायमस्वरूपी मोडण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन पाच टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात करण्यात आले आहेत त्यामध्ये १२ ऑगस्ट पासून चालु असलेले साखळी आंदोलन करण्यात आले त्यांनतर २० ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी एक दिवसीय लक्षवेधी आंदोलनास कंत्राटी कामगार बसणार आहेत यावेळी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करुन २४ ऑगस्ट ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी तीव्र शब्दात शासन व प्रशासनाला धारेवर धरले व होणाऱ्या नुकसान सर्वस्व शासन जबाबदार राहील अशा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे .
कंत्राटी कामगार हा तटपुंज्या पगारावर नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून आपले जिव धोक्यात टाकून काम करतो त्यांना कसल्याही प्रकारचे वैद्यकीय सेवा नाही परंतु हे सर्व राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या लक्षात आणून सुध्दा शासन योग्य निर्णय घेऊन कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा.
अध्यक्ष अंकुश डोंगरवार
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ चंद्रपूर
0 comments:
Post a Comment