घाटंजी प्रतिनिधी -निवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन तत्वावर शिक्षण विभाग नियुक्त करीत आहे. आज बेरोजगारांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. हाताला काम नाही, शेती व्यवसाय सतत तोट्यात जात आहे, मजूरांच्या हाताला काम नाही.याही परिस्थितीत थकलेला बाप कुटूंबाचा गाढा ओढत आहे अशा परिस्थितीमध्ये डि एड, बि एड झालेले हजारो तरुण रिकामे बसले आहे. निवृत्ती धारकांचा अनुशेष शासन भरून काढेल व कुठेतरी आपल्याला नोकरी मिळेल, अशा आशयाने बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या
Retired teachers should give employment opportunities to post-graduates without joining the school - Moreshwar Watile
.परंतू शासनाच्या अन्यायकारक धोरणाने बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता निवृत्त शिक्षकांच्या सध्या महाराष्ट्रात शिक्षण विभाग नियुक्त्या करीत आहेत.बरं निवृत्त शिक्षकांचे सगळे कौटुंबिक प्रश्न सुटले आहेत.त्यांना अर्धे पेंशन मिळत आहे.त्यांच्या पाल्यांना पण कुठे सरकारी नोकरी अथवा खासगी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे.तरी पण निवृत्त शिक्षक, नियुक्ती मिळावी म्हणुन शिक्षण विभागा कडे अर्ज करीत आहे. हे अतिशय दुर्देवी असून थोडा संवेदनशीलपणे विचार केला तर बेरोजगारांना काही प्रमाणात न्याय मिळाल्या शिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट बेरोजगारांना नियुक्त्या मिळाव्या या साठी शिक्षक संघटनांनी शासना कडे रेटा धरावा संबंधित अध्यादेश रद्द करण्या साठी आंदोलन करावे व शिक्षण विभागानेही बेरोजगारावर होणारा अध्यादेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर वातीले यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
0 comments:
Post a Comment