चंद्रपूर :-जिल्हा सामान्य रूग्णालयातील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रूग्णालयात एम.आर.आय. टु.यु.को. मशीन व सि.टी.स्कॅन मशीन बंद असल्यामुळे येथील मरिज व नातेवाईकांना अनेक प्रकारच्या समस्यांना समोर जावे लागत आहे. पेशंट ला मेडीकल साहीत्यांची आवश्यकता पडल्यास बाहेरून आणण्याचा सल्ला देण्यात येतो. तोपर्यंत पेशंट अधिक दगावतो. यामुळे जिल्हा रूग्णालयातील दुकानदारी बंद करून उक्त मशीन नागरीकों का उपलब्ध कराव्या आणि गरोधर महिलांसाठी अधिक बेड व सुखसुविधा उपलब्ध करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया आठवले गुट च्या जिलाध्यक्षा प्रिया खाडे यांनी पत्रकार परीषदेत केली. मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
काही गोरगरीब लोक रूग्णालयावर तसेच प्रशासनावर विश्वास करून उपचारार्थ येतात तेव्हा त्यांना जी व्यवस्था उपलब्ध करून देतात त्यांना ती उपलब्ध होत नाही. तेथील गोरगरीबांना काही औषधी बाहेरच्या खाजगी मेडीकल मधुन उच्च भावात विकत घ्यावे लागतात आणि ते लाचार असल्यामुळे त्यांना घेणे आवश्यक असतात. त्या कारणामुळे त्यांना वाजवीपेक्षा जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रूग्णालयातील कार्यरत वैद्यकिय अधिकारी एम.आर.आय., दु.यु.को. मशीन व सि.टी. स्कॅन रूग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे बाहेरील खाजगी रूग्णालयातुन करून आणायला सांगतात.त्यामुळे गोरगरीब लोकांना बाहेर खर्च करण्याकरीता त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो तसेच त्यांची आर्थिक दुष्टया कमकुवत असलेल्या रूग्णांना व रूग्णाच्या नातेवाईकांना फार मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. गरोदर महिलांना वार्डमध्ये बेडची खुप कमतरता असल्यामुळे गरोदर महिलांना तसेच प्रसुती महिलांना छोटयाशा बाळाला घेवुन खाली फरशीवर 2 ते 3 दिवस बाळाला घेवुन खाली बसावे व झोपावे लागत आहे. रूग्णालय प्रशासन कडुन त्यांची हेडसांड होत आहे. यासंदर्भात रूग्णालय प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे दुलर्क्ष करण्यात येत आहे. रूग्णालयातील समस्यांना घेऊन जन सामान्य आकोश मोर्चा शांतीरित्या काढण्यात आला. आगामी 10 दिवसात रूग्णालयातील समस्यांचे समाधान न केल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आ.) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनतेच्या वतीने आमरन उपोषण केल्या जाईल व याची संपूर्ण जिम्मेदारी प्रशासनाची राहील असा इशारा प्रिया खाडे यांनी दिला आहे.
पत्रपरिषदेला ज्ञानेश्वर नगराळे, विकीराज वानखेडे, खुशाबराव सिडाम, रेखा रामटेके, माया रामटेके आदि उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment