जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील
सर्व तालुक्यातील कामावर मृत्यू व गंभीर जखमी झालेल्या बांधकाम कामगारांच्या नातेवाईकांना शासकीय आर्थिक मदत मागील ५ वर्षापासून मिळालेली नसून सदर मदत तातडीने मिळण्याकरिता दिनांक ८. ८ २०२४ ला मा. सहायक कामगार आयुक्त
मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून त्याची प्रत विजय भाऊ वडेट्टीवार विरुद्ध पक्ष नेते प्रतिभाताई धानोरकर खासदार सुभाष भाऊ धोटे आमदार यांना पाठवण्यात आली.सदर निवेदनाची दखल समस्त अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी घेतली.
Finally, the heirs of deceased construction workers, pending since 5 years, will get government assistance
दिनांक २६.ला छोटूभाई शेख यांच्या तक्रारीवरून सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कार्यालयात बैठक आयोजित केली सदर बैठकीला छोटू भाई व त्यांचे सहकारी व कामगारांचे नातेवाईक वारसान उपस्थित होते बैठकीत खालील प्रमाणे १) सध्या १० ऑनलाइन असलेले प्रकरण मंजुरी करिता वरिष्ठ कार्यालयात १५ दिवसाच्या आत पाठवून त्यांना शासकीय मदत लवकर देण्यात येईल .२ मागील५ वर्षापासून आतापर्यंत५१ प्रलंबित असलेले प्रकरण ऑनलाईन करून किंवा अडचण आल्यास शपथपत्र व अर्ज जोडून वरिष्ठाकडे अंतिम मंजुरी करिता लवकरात लवकर पाठवून शासकीय मदत मिळण्याकरिता कारवाई करण्यात येईल असे चर्चा बैठकीत झाले.
आणि यावर या निर्णय घेण्यात आले त्यामुळे मागील ५ वर्षांपासून प्रलंबित असलेले गोरगरीब मृत्यू व गंभीर जखमी कामगारांच्या वारसांना यांना हक्काचे शासकीय आर्थिक मदत मिळणार सदर बैठकीला कामगार आयुक्त साहेब शेख जैरुदीन छोटू भाई प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार कर्मचारी विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल जाधव कमलेश बांबोडे जावेद भाई महिला जिल्हा अध्यक्ष श्रीमती शालिनी भगत व इतर पदाधिकारी उपस्थित होते तरी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कामावर मृत्यू व गंभीर जखमी झालेल्या बांधकाम कामगारांच्या नातेवाईकांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालय व छोटूभाई यांच्याकडे संपर्क करून आपले प्रलंबित कामे मार्गे लावून सदर मदतीचा लाभ घ्यावा
0 comments:
Post a Comment