चंद्रपुर :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. या विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सर्व फ्रंटल ऑरर्गनायझेशनच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.
Collapsing the statue of Chhatrapati is an insult to Maharashtra alone
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही बुरुज ढासळला नाही. पण, ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला. याचा अर्थ महायुतीचे हे सरकार 4 डिसेंबर २०२४पूर्वी सत्तेतून नक्कीच कोसळेल आणि या राज्यातील जनता महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर बाहेर काढेल, राज्यातील तिघाडी सरकार हे भ्रष्टाचारी आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात मलाई खाण्यात आली. या सरकारच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी दिली.
या आंदोलनात इंटकचे राष्ट्रीय सचिव के.के. सिंग, अल्पसंख्याक आघाडीचे सोहेल शेख, माजी महापौर संगिता अमृतकर, माजी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अनिरुद्ध वनकर, रमजान अली, सुधाकर अंभोरे, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कदम, पिंटू शिरवार, गोपाल अमृतकर, मतीन कुरेशी, नरेंद्र बोबडे, राहुल चौधरी, भालचंद्र दानव, नौशाद शेख, राजू वासेकर, सुनंदा ढोबे, मुन्नी बाजी, रेखा वैरागडे, पितांबर कश्यप, राजीव खजांची, यश दत्तात्रय, गुंजन येरणे, गुरफान अली, पितांबर कश्यप, इरमान शेख, ताजुद्दीन शेख, ताज कुरेशी, रमजान अली, वीर, सागर खोब्रागडे, साबीर सिद्धकी, अशोक गडमवार, गौस खान,आमिर शेख, रमीझ शेख, सौरभ ठोंबरे आणि समस्त कार्य करणी उपस्थीत होते..
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment