.जावेद शेख भद्रावती:-तालुक्यातील मांगली येथील नाल्यातून अवैध रेतीचा भरणा करून शहरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला पकडले.सदर कारवाई भद्रावती महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे शहरातील किल्ला वार्ड येथे करण्यात आली.
Revenue department action against tractors transporting illegal sand
गवराळा येथील किसन जीवतोडे यांच्या मालकीच्या असलेल्या एम. एच.34 एच 90 81 या ट्रॅक्टर मधून मांगली येथील नाल्यातून अवैध रेती भरून त्याची शहरात वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे सदर ट्रॅक्टर पकडण्यात आले. व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले सदर कारवाई नायब तहसीलदार मलिक पठाण यांचे नेतृत्वात कोतवाल बंडू पारखी यांनी केली.
0 comments:
Post a Comment