जावेद शेख भद्रावती: तालुक्यातील क्रीडा संकुल भद्रावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे आहेत. हा महोत्सव मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
Grand Dahihandi festival held in Bhadravati
या महोत्सवात प्रसिद्ध सिनेकलाकार भारत गणेशपुरे हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
कार्यक्रमात लावणी कलाकारांचाही समावेश असून, त्यांचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे. कार्यक्रमाचे अँकरिंग प्रसिद्ध अँकर परेश हे त्यांच्या खास डॉ. गुलाटी यांच्या वेशभूषेत करणार आहेत, जे विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
या महोत्सवात भद्रावतीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाप्रमुख तथा वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 comments:
Post a Comment