जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ट्रेझरी कार्यालयात रात्रोच्या वेळेस आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भद्रावती येथील ट्रेझरी कार्यालयात दिनांक 24 रोज शनिवारला रात्रो साडेसात वाजता घडली. मधुकर कोंडू आत्राम, वय 55 वर्ष, राहणार मूळ चंद्रपूर असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते भद्रावती पोलीस स्टेशन येथे पीएसआय पदावर कार्यरत होते.
Death of policeman on duty at Treasury office.
घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.मृतक मधुकर आत्राम यांची नेहमी येथील ट्रेझरी कार्यालयात रात्रीची ड्युटी राहत होती. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाल्यानंतर बऱ्याच वेळाने ट्रेझरी कार्यालयातील लाईट बंद दिसल्याने शेजारील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने जाऊन पाहिले असता ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्याला शंका आल्याने त्याने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आत्राम हे मृता व्यवस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. व पत्नीचे निधन दोन वर्षांपूर्वी झालेली आहे त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पीएसआय मुळे करीत आहे
0 comments:
Post a Comment