Ads

तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवामध्ये श्री समर्थ विद्यालय प्रथम

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-पंचायत समिती घाटंजी व श्री समर्थ विद्यालय घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेचे आयोजन श्री समर्थ विद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये पंचायत समितीमधील शाळा व तसेच घाटंजी शहरातील शाळेचा समावेश होता.यामध्ये श्री समर्थ विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हा स्तरावर आपले स्थान निश्चीत केले आहे.
Shree Samarth Vidyalaya stands first in taluka level science drama festival
नाट्योत्सवाचे उद्घाटन विस्तार अधिकारी श्री सुधाकर वाढंरे साहेब यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री देवदत्त जकाते होते प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी प्रज्ञा पाटील केंद्रप्रमुख अशोक सिंगेवार समर्थ विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अमोल वैद्य पर्यवेक्षक अरविंद मडावी हे उपस्थित होते.
या विज्ञान नाट्योत्सवांमध्ये तालुक्यातील एकूण 13 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपल्या नाटिकेचे सादरीकरण केले या नाटिकेचे परीक्षण शरद सोयाम व आकाश कवासे यांनी उत्तमरित्या केले यात श्री समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता व आरोग्य या विषयावर आधारित सुंदर नाटिका सादर केली त्यामुळे ही नाटिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली यात सहभागी विद्यार्थी संचित गोरे, आयुष आस्वले, नैतिक खंडागळे, आदित्य काळे, श्वेता नागोसे, साक्षी जाधव, गौरी वानखेडे, स्वरा गवारकर या विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय करत नाटिकेचे सादरीकरण केले.
या नाटीकेला सरिता ताजणे यांनी मार्गदर्शन केले व तसेच मुख्याध्यापक श्री देवदत्त जकाते ,मृणाल जलतारे ,कांता पंडागळे आदी शिक्षकांनी सहकार्य कले मुलांच्या या यशाबद्दल श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री मधुसूदन चोपडे, सचिव नरेश वैद्य, उपाध्यक्ष श्री निळकंठराव डंभारे व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे संचालन सरीता ताजणे तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मृणाल जलतारे यांनी केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment