Kusumbi Mines Excavation Blocked Protestors Outbreak of Injustice on Adivasis
गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम नायब तहसीलदार यांनी हस्तक्षेप करून आंदोलन करताना समज दिली व याबाबत आपण वाहतूक खुली करावी शासन स्तरावर अहवाल पाठवून आपल्या मागणी बाबत वरिष्ठ पातळीला कळविण्यात येईल असे आश्वासन देऊन बंद पडलेली वाहतूक सुरू केली या भागातील अनेक महिला पुरुष आपला तीव्र संतोष घोषणा करून कंपनी विरुद्ध नारेबाजी करून अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला 18 आदिवासी कुटुंबांना जमिनीचा मोबदला विस्थापित अनुदान आजच्या बाजारभावाने देण्यात यावा शासनाच्या धोरणानुसार 80% स्थानिक युवकांना रोजगार द्यावा मात्र कंपनी परप्रांतीय लोकांना कामावर घेऊन स्थानिक परिसरातील युवकावर अन्याय करीत आहे कंपनीच्या उत्खनन केलेल्या खदानीमध्ये जलसंचयन झाले आहे त्या ठिकाणी मासेमारीचा अधिकार पेसा क्षेत्रात असल्याने ग्रामसभेला देण्यात यावा माणिकगड सिमेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीमान्तर्गत कोणत्याही प्रकारचे कामे केल्या जात नाही कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असून पंचकोशीत कुठल्याही विकासाची कामे कंपनी मार्फत घेतल्या गेलेली नाही यासाठी गेल्या दहा वर्षातील निधीच्या खर्चाची चौकशी करण्यात यावी नोकारी कुसुंबी लिंगनडोह आसापूररस्त्याचे बंद पाडलेले काम तात्काळ करण्यात यावे तसेच पेयजल योजनारस्ते विकासाची कामे इतर सोयी सुविधा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत देण्यात यावे कंपनीच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा वाद सुटत नसल्याने शासनाने महसूल वन विभागाचे संयुक्त भूमापन मोजणी करून सीमांकन करण्यात यावे मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर असलेल्या अतिक्रमणाबद्दल कंपनीवर कारवाई करावी तसेच चौथ्या टप्प्याकरिता 189 हेक्टर जमीन देण्यात येऊ नये याकरिता 2013 पासून आक्षेप दाखल केले असून आसापूर ग्रामपंचायतच्या पेसा ग्रामसभेत जमीन देण्यात येऊ नये असा ठराव पारित करण्यात आलेला आहे या संपूर्ण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज वाहतूक रोखून करण्यात आली होती मात्र पोलीस व महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करून वाहतुकीचा रस्ता खुला केला आंदोलनकर्त्यांनी सप्टेंबरच्या ५ तारखेपूर्वीप्रश्न मार्गी लावावे अन्यथा सात तारखेला कंपनीच्या उत्खननासह रोपवे दगडाची वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याबाबत शासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा आदिवासींच्या होणाऱ्या नुकसानी बद्दल अल्ट्राटेकसिमेंट कंपनी जबाबदार राहील या ठिकाणी असलेल्या कामगारांना वेज बोर्ड नुसार मजुरी दिल्या जात नाही व त्यांची देखील कामगार विभागाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळेस केशव कुळमेथे भाऊराव कनाकेविजय चव्हाण रामदास मंगाम उद्धव पवार उत्तम पवार बाबू पवार जिजाबाई सुमित्राबाई राठोड सुधाकर जाधव यांच्यासह अनेक प्रकल्प बाधित कार्यकर्ते उपस्थित होते ठाणेदार शिवाजी कदम यांनीआपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्त तैनात केला होतामहसूल विभागाचे नायब तहसीलदार पीए शिल उपस्थित होते आंदोलन कर्त्याच्या भावना तीव्र होत्या व या ठिकाणी शासन प्रशासनाचा सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध अनेकांनी आपल्या विचारातून व्यक्त केला
0 comments:
Post a Comment