सादिक थैम वरोरा:कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अन्याय व अत्याचाराचा वरोरा तालुका डॉक्टर एसोसिएशने धरणे आंदोलन देत निषेध केला.यासाठी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात 18 आगस्ट रोज रविवारला सायंकाळी हे धरणे आंदोलन केले.
डॉक्टर मौमिता हम शर्मिंदा है, तुम्हारे कातिल आज भी जिंदा है।, बलात्कारी इसमावर दया दाखवू नका, त्यास फाशी द्या., आम्हास न्याय हवा, महिला डॉक्टर वरील अत्याचारास आळा घाला अशा आशयाचे बॅनर्स घेत या प्रसंगी डॉक्टर घोषणा देत होते.
कोलकत्ता येथील आरजीकार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये ९ ऑगस्ट ला डॉक्टर मौमिता देबनाथ या 31 वर्षीय महिला डॉक्टर वर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या डॉक्टरला न्याय मिळावा व या घटनेचा निषेध म्हणून वरोरा तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे हे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी आंदोलनास उपस्थित सर्व वैद्यकीय डॉक्टर्सनी मेणबत्ती प्रज्वलित करत आपली श्रद्धांजली अन्यायग्रस्त डॉक्टर मौमीता देबनाथ यांना अर्पण केली.
याप्रसंगी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सागर वझे यांनी देशात डॉक्टर मंडळीवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला व या हल्ल्यातील डॉक्टरांना योग्य न्याय व विशेषतः महिला डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाने पाऊल उचलावे अशी मागणी केली.
या आंदोलनात तालुक्यातील सर्व पुरुष व महिला डॉक्टर सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment