चंद्रपुर /दुर्गापूर :- पानठेलेवाल्याने
खऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Sexual abuse of minor girl due to non-payment of loan
बबन रोहणकर याचा पानठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने त्या मुलीला खऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून बबनने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.
असा उघडकीस आला प्रकार
पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली.
0 comments:
Post a Comment