चंद्रपूर : गडचांदूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावर निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंत्रर दोन वाजताचे सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात जिवती तालुक्यातील चार मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.
A speeding car collided with a truck; Four friends died in a terrible accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिवती तालुक्यातील पाच तरुण (एम.एच.- ०४ एफ.आर. -४०८१) या अर्टिगा कारने चंद्रपूर वरून गडचांदूर कडे येत असताना गडचांदूर पासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक (एम .एच. -१८- एन – ६६५६) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज गव्हाले (२२)रा. शेणगाव, सुनील किजगीर (२७) रा. शेणगाव, आकाश पेंदोर (२२) रा. पाटण, श्रेयश पाटील (२२) रा. टाटाकोहोड या चार मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अजय गायकवाड रा. कोलामगुडा हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठविला व गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र, जखमी युवक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे. मागच्या आठवड्यात सुद्धा याच मार्गावर उभ्या ट्रकला धडक दिल्याने दोन जणांच्या मृत्यू झाला होता. मध्यरात्री अशीच पुनरावृत्ती झाल्याने मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोक संतापले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करत उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन मध्ये आणले व रास्ता खुला रहदारीस केला. समोरील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment