चंद्रपूर :-अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातून राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्टट्रिक बसेस धावणार आहेत. येत्या गुरुवार, १२ सप्टेंबरपासून जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून बसेसच्या कमतरतेमुळे प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत असलेल्या प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७६ वर्षांच्या इतिहासात प्रवाशांच्या सोयीनुसार बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वी बसेसचा एकच रंग लाल असल्यामुळे त्याला सामान्य भाषेत लालपरी म्हणत. आता अनेक बसेसची नावे आणि रंग बदलले आहेत. साधारण, सुपर फास्ट, हिरकणी, विठई, शिवशाही, शिवशाही शयनयान, अश्वमेध आदी बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. आता एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे. चंद्रपूर विभागाला 10 बसेस प्राप्त झाल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर या बसेस 12 सप्टेंबर रोजी चंद्रपूर _ घुघुस _ वणी आणि चंद्रपूर _ मूल _ गडचिरोली या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक बसमध्ये 35 आरामदायी आसने आहेत जी पूर्णपणे समायोजित करण्यायोग्य आहेत. ते वातानुकूलित आहे. या बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नियमानुसार तिकीट दरात सूट दिली जाईल. एकूण प्रवाशांपैकी एक चतुर्थांश प्रवासी उभे राहूनही प्रवास करू शकतील.
ही बस सकाळी ७ वाजता चंद्रपूर ते गडचिरोलीसाठी निघेल. ही बस दर तासाला सुटणार आहे. अखेर संध्याकाळी 5.15 वाजता बस पोहोचेल. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत चंद्रपूर ते वणी दर तासाला बस असेल.
0 comments:
Post a Comment