बल्लारपूर :-बल्लारपूर पोलिस दि 22/09/2024 रोजी सायंकाळी 18.00 वा. दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत बाजारात पेट्रोलिंग करीत असता मुखबीरव्दारे खबर मिळाली की, डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर येथे राहणारा मोहम्मद शाह हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपल्या जवळ लोखंडी तलवार बाळगून आहे
अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पंच 1) राजू बबन राठोड वय 56 वर्षे रा. साईबाबा वार्ड बल्लारपुर 2) बदन परसादी वर्मा वय 62 वर्षे रा. सरदार पटेल वार्ड बल्लारपुर यांना नगर परीषद चौक येथे बोलावून खबरेची माहीती देवून पंच म्हणून हजर राहण्याबाबत सूचना केल्या नंतर पंच सोबत पोस्टॉप.घेऊन पंचासह मोहम्मद शाह याचे डॉ. झाकीर हुसेन वार्ड येथील घरासमोर जावून आवाज दिला असता एक व्यक्ती घरा बाहेर आला त्याची चौकशी केली असता आपले नाव मोहम्मद कासीम शाह वय 24 वर्षे रा. डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगीतले त्यास लोखंडी तलवार बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले वरून पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता घरातील मधल्या खोलीतील सज्जावर लोखंडी तलवार मिळून आली. त्याबाबत त्यास लोखंडी तलवार बाळगण्याचा परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले वरून सदर तलवार पंचा समक्ष जप्त करण्यात आली.आरोपी मोहम्मद कासीम शाह हा लोखंडी तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कृत्य केल्याने कलम 4, 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा पो.नि. सुनिल वि.गाडे,यांचे मार्गदर्शनात
पोउपनि. हुसेन शहा,सपोनि. दिपक कांक्रेडवार ,पोहवा.रणविजय ठाकूर/2261, सुनिल कामतकर / 957. पुरुषोत्तम चिकाटे/2182, सत्यवान कोटनाके ब.नं. 2346, संतोषे दंडेवार/2297, पोअं. वशिष्ट रंगारी /187, मिलिंद ब.नं. 2756, इ. स्टॉफ यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment