बल्लारपूर :- बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२१/०१/२०१५ चे सायंकाळी १८.१५ या. चे सुमारास मुखबिरने माहिती दिली की, सुभाष वाई येथील जोक्कू नाल्याजवळ राहणारा हिरा बहुरीया हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने तलवार बाळगून आहे अशी मुखबिरव्दारे खबर मिळाल्याने माहितीची शहानिशा करण्यासाठी पंचासह पो. स्टॉफ रवाना होवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन एक धारदार लोखंडी तलवार कि.अं.५००/- मिळून आली.
Ballarpur police arrested one accused with a sword
तलवार मिळुन आल्याने आरोपीत हिरा ईश्वर बहुरीया वय-४१ वर्षे, रा. सुभाष वार्ड, ओक्कु नाला बल्लारपुर जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवून कलम-४,२५ आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनिल वि.गाडे, सपोनि.दिपक कांक्रेडवार, पोउपनि, हुसेन शहा, सफी, गजानन डोईफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा. सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
तसेच ईद आणि गणपती दरम्यान यापूर्वी सुद्धा विषेश मोहीम राबवून बल्लारपूर परिसरातून वेगवेगळ्या भागातून आतापर्यंत ५ आरोपींना तलवारी सह अटक करण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment