जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
आपल्या परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले.त्यामुळे आरक्षण व संविधान विरोधात काँग्रेस पक्ष असल्याची टीका करीत शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वातसर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले, काँग्रेस तथा राहुल गांधीचा निषेध करण्यात आला.
Denial of Rahul Gandhi and Congress by Shiv Sena Shinde Group
यावेळी काँग्रेस व राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष हा खरा आंबेडकर विरोधी असून काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, राजेश डांगे, कल्पना ताई भुसारी, मदन चिकना मनीष बुच्चे, पेंदाम,,जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment