Ads

जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांना काम द्या.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रत्येक वर्षात काढण्यात येत असलेल्या निवेदनां पैकी 33% निविदांची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा शासनाचा नियम असताना या नियमांचे पालन कार्यालयाकडून करण्यात येत नाही.
Give work to unemployed engineers in the district.
त्यामुळे बेरोजगार अभियंत्यांना काम न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून बेरोजगार अभियंत्यांना शासनाच्या नियमानुसार काम द्यावे अशी मागणी राज्य अभियंता संघटनेतर्फे चंद्रपूर येथील जिल्हा अधीक्षक अभियंत्याला सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच बेरोजगार अभियंत्याच्या विविध मागण्या निवेदनातून शासनासमोर मांडण्यात आले आहेत. निवेदन सादर करताना राज्य अभियंता संघटनेच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment