Ads

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून महामहीम राज्यपाल चंद्रपूर जिल्ह्यात

चंद्रपूर- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या महिन्यात महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्यपाल महोदयांना चंद्रपूरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी ‘आदिवासी लोक संस्कृतीचा आविष्कार बघण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात नक्की येईल’, अशी ग्वाही राज्यपालांनी ना. मुनगंटीवार यांना दिली होती. ना. मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून राज्यपाल महोदय आता चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत. १ ऑक्टोबरला ते पोंभूर्णा येथे आदिवासी समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
On the invitation of Min. Sudhir Mungantiwar, His Excellency the Governor in Chandrapur District
दिवाळीच्या पूर्वी राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करताना पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपारिक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही राज्यपाल महोदयांनी ना. मुनगंटीवार व पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांना दिली होती. आदिवासी समाजाचे अधिकार आणि त्यांची लोक संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी म्हटले होते. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्याला येण्याचे निमंत्रणही राज्यपाल महोदयांना दिले होते. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले होते आणि आता १ ऑक्टोबरला या महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत.

१ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता पोंभुर्णा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आदिवासी समाजाचा मेळावा होणार आहे. यावेळी महामहीम राज्यपाल महोदय व ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील आदिवासी बांधव या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याठिकाणी आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा होणार असून समृद्ध अशा आदिवासी लोकसंस्कृतीचे सादरीकरण देखील बघायला मिळणार आहे.

ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे…
ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल आपल्या मेळाव्याला येत आहेत, याबद्दल आनंद आणि उत्साह आदिवासी समाजात आहे. त्यासाठी त्यांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार देखील मानले आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संस्कृतीचे जतन करण्यासाठी ना.मुनगंटीवार सातत्याने प्रयत्न करीत असतात, हे विशेष.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment