चंद्रपुर :- शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केजीएन पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूरच्या शिक्षिका सरला वेलपुरी व रिंकू चव्हाण यांना शिक्षक आमदार श्री.सुधाकर अडाबळे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Teachers of KGN School were felicitated on Teachers' Day.
यावेळी राजुराचे माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते आ. वामनरावजी चटप, भूमिपुत्र ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ.अभिलाषा गावतुरे, साप्ताहिक कलाम मांगे इंसाफचे मुख्य संपादक सय्यद रमजान अली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेचे संस्थापक महमूद शेख यांनी शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकत अध्यापनाचे कार्य फार मोठे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रतीक्षा दहिवले यांनी केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता करमरकर, उपमुख्याध्यापिका सीमा माकडे, शाळेच्या प्रशासक झीनत खान, श्वेता डोणवार, तोसिफ अहमद व संस्थेचे चंद्रपूर व बल्लारपूरचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment