चंद्रपुर :- जिल्ह्यातील गडचांदूर येथे विद्यार्थ्यांनी भरलेली लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची स्कूल बस उलटल्याची घटना समोर आली आहे.
A school bus carrying 40 students overturned
5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळची शाळा संपल्यानंतर शाळेची बस मुलांना सोडण्यासाठी निघाली होती. गडचांदूर येथील हरदोनाजवळ दुपारी १२.४५ वाजता स्कूल बस उलटली. या बसमध्ये 40 शालेय विद्यार्थी होते. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमींना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर आ. सुभाष धोटे यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर गाठून जखमींची भेट घेतली. विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून उपचार सुरू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. यावेळी आ.धोटे यांच्यासह प्रा. आशिष देरकर, उमेश राजूरकर, विजय ठाकूरवार, सचिन भोयर, सागर ठाकूरवार, रुपेश चुधरी, सतीश बेटावार, मनोज भोजेकर, अभिषेक गोरे, मयूर एकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment