चंद्रपूर :-नकोडा निवासी हाजी सरवर शेख यांचा 12 आगस्ट 2024 ला बिनबागेट, येथील होटल शाही दरबार येथे गोळया झाडुन तीक्ष्ण हत्यारांने निर्मम खून करण्यात आला. सदर प्रकरणात आता पर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात मुलाचा खुण करण्यामागे कोणाचा हात आहे आणि कोण सदर आरोपींना आर्थिक मदत देत होता व कोण त्यांना शास्त्र पुरविले आहे या बाबत अजून तपास करण्यात आला नाही. यासंदर्भात सीआईडी तपास करण्याची मागणी सलमा बेगम सरवर शेख यांनी पत्रकार परीषदेत केली आहे.
घटने पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अग्निश्स्त्रांचा वापर करून खून करणे किंवा खुनाच्या प्रयत्न करणे सारखे गुन्हे सतत घडत होते. त्यामुळे जिल्हा पोलीस विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा यांनी शस्त्र जप्तीची मोहिम राबविली होती व सावधानता बाळगल्याचे जनतेला सांगण्यात आले होते. अपराध शाखा यांची जिम्मेदारी सपूर्ण जिल्ह्याची असते आणि त्यांचाकडे गुप्तहेर माहिती सुद्धा असते.
हाजी सरवर चे मारेकरी शस्त्र घेवून दुस_या जिल्ह्यातून चंद्रपूर शहरात दाखल झाले, दोन दिवस मुक्काम केला. तेव्हा पोलीस व अपराध शाखा पूर्णत अनभिज्ञ कसे होते. खून केल्यानंतर जवळचे शहर पो. स्टे. किंवा रामनगर पो. स्टे सोडून मारेकरी सरळ स्थानीय गुन्हा शाखा येथे गेले. आरोपी समीर हा सराईत गुन्हेगार आहे. चंद्रपूर जिल्ह्या बाहेर इतर खुनाचे गुन्हे नोंद आहेत. तो गुन्हा केल्यानंतर तिथेच आत्मसंपर्ण करतो जिथे पहिले पासून त्याचा संपर्क असतो व सर्वकाही ठरलेला प्लान होता. सर्व बाबींचे विचार केले असता स्था.गु.शाखेची भूमिका हि संशास्पद आहे. म्हणून स्था. गु. शाखेचे भूमिकेची सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच स्था. गु. शा. पूर्वी पासून आरोपींचा संपर्कात होते किंवा कसे हे जाणून घेण्याकरीता त्यांचे CDR व SDR काढणे सुद्धा गरजेचे आहे. हाजीर सरवर चा खून होणार आहे याची माहिती 15 दिवसा आधी पासून होती. परंतु माझा मुलाला पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. वरील सर्व बाबींचा विचार करून हाजी सरवर खुनाचा गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडून किंवा स्वतंत्र तपास यंत्रणे कडून करण्याची मागणी हाजी सरवर ची आई सलमा बेगम सरवर शेख ने पत्रकार परिषदेत केली आहे.
-----------------------------------
0 comments:
Post a Comment