चंद्रपुर:- अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या रडारावर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे.
The police arrested a person who sold and smuggled illegal liquor, the local crime branch Chandrapur took action
दिनांक 28/10/2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत मौजा चूनारा येथील आरोपी अनिलसिंग अदबसिंग जुनी, वय 30 वर्ष, रा. चिनोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याचे घरी जाऊन घरझडती घेतली असता अवैध रित्या विक्रीसाठी१) 54 पेट्या देशी दारू- किंमत १,८९,०००/-
२) 08 पेट्या विदेशी दारू - किंमत 66,460/-अशा एकूण 62 पेट्या देशी-विदेशी दारूचा एकूण 2,55,160/- रू. चा मुद्देमाल मिळून आला.आरोपीला अटक पो स्टे वरोरा येथे अप. क्र. 759 /2024 कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करून सदर मुद्देमाल मोररह च्या ताब्यात देण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. विनोद भुरले, स.फौ. स्वामिदास चालेकार, धनराज करकाडे, पो.हवा. नितीन कुरेकर, अजय बागेसर, पो. अं. शशांक बदामवर सर्व स्थागुशा चंद्रपूर यांनी केली
0 comments:
Post a Comment