भद्रावती जावेद शेख:- राजकारणात घराणेशाहीला उधान आले असून आमदारकी, खासदारकी व महत्त्वाची पदे ही आपल्या घरातच कशी राहील यासाठीच प्रस्थापित राजकारणी प्रयत्नात आहे.या निवडणुकीतही प्रमुख पक्षांनी घराणेशाहीतूनच उमेदवार दिले आहे. हा इतर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण न होता ते केंद्रित होते. त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाहीला हद्दपार करून नागरीकांच्या समस्यांची जाण असलेल्या प्रामाणिक उमेदवारालाच आपले मत द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांनी मतदारांना केले.
Banish nepotism. : Dr. Chetan Khutemate.
भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या प्रचार सभेचे भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिराच्या पटांगणात दिनांक 11 ला आयोजन करण्यात आले, त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. दिलीप चौधरी, प्रेमदास आस्वले, विद्याताई मोघे, केशव तीराणीक,गजानन घुमे, योगेश मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्थापित नेत्यांनी राजकारणाचे व्यावसायिकरण केले असून सत्ता ही आपल्या घरातच कशी राहिल यासाठी प्रसंगी ते भांडणे देखील करीत आहे. क्षेत्राच्या विकासाकडे, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे, शिक्षण क्षेत्राकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून टैक्स रूपाने गोळा झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर हे स्वतः मौजमजा करून स्वतःची घरे भरीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची स्थिती मात्र दिवसेंदिवस हलाखीची होत चालली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, त्यासाठी बदल घडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून क्षेत्रातील मतदारांनी एक वेळ माझ्यावर विश्वास टाकावा असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांनी यावेळी केले.सदर सभेला नागरीकांनी प्रचंड गर्दी केली.
0 comments:
Post a Comment