मूल : थोरामोठयांची परपंरा आणि इतिहास असलेल्या काॅंग्रेसने सामाजीक वाद न करता जनतेचे हित डोळयासमोर ठेवून देशाचा विकास साधला असून भाजपाने ओबीसींवर सातत्याने अन्याय केला आहे. राज्यात बेरोजगारीचा आलेख सातत्याने वाढत असून महागाईने भगिनींचे कंबरडे मोडले आहे. त्यामूळे विकासाचे चक्र सुरू ठेवण्यासाठी काॅंग्रेसच्या पाठीशी उभे राहावे. अशी विनंती काॅंग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली.
मूल येथे पार पडलेल्या माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या स्नेहमिलन सोहळया प्रसंगी भानुदास माळी बोलत होते. संस्थेचे राज्य अध्यक्ष तुळशिराम जांभुळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवाणी, ओबीसी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख विजय राऊत, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, गुरूदास चौधरी, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्ष शिल्पा बनपुरकर, महिला जिल्हाध्यक्ष रजनी हजारे आदि उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तुळशिराम जांभुळकर यांनी प्रास्ताविक केले तर संघटनेचे प्रदेश महासचिव प्रशांत गदाला यांनी मनोगत व्यक्त करतांना अन्याया विरूध्द लढा पुकारण्यासाठी संतोषसिह रावत यांच्या पाठीशी सर्व पदाधिका-यांनी उभे राहण्याचे आवाहन केेले. संतोषसिंह रावत यांनी मनोगत व्यक्त करतांना पंधरा वर्षापासून आमदार असलेल्या भाऊपासून आपली संघटना दुर्लक्षीत असल्याने अन्यायाविरूध्द लढण्यासाठी मी आपल्या सोबत सदैव राहील. असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचलन आणि उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष डाॅ. आनंदराव कुळे यांनी केले. कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
संघटनेचा रावत यांना जाहीर पाठींबा
समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी संतोषसिंह रावत सतत प्रयत्नशील असतात म्हणुन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन माहीती अधिकार, पोलीस मिञ व पञकार संरक्षण सेना काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठींबा देत असल्याचे राज्य अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर यांनी जाहीर केले.
0 comments:
Post a Comment