चंद्रपुर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज पटांगणात संविधान दिवस साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य दीपक मस्के ,उपप्राचार्य जमीर शेख सर, तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजचे प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे , उपप्राचार्य अनिल खुजे, प्रा. मोजस सर, ग्रंथपाल भारती घटे,रजिस्टर बिसेन सर उपस्थित होते.
‘’आपले संविधान आपला आत्मसन्मान ‘’संविधान दिवसाविषयी विद्यार्थांना मान्यवरांनी माहिती देत असताना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकृत करून दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबाजवणी सुरु झाली,त्यामुळे हा दिवस भारतीय संविधान म्हणून साजरा केला जातो. तसेच देशात समता,बंधुता,न्याय,स्वात्रंत ही मूल्य रुजली आहे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव योगदानातून घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी समर्पित करून प्रजासत्ताक राष्ट्राची पायाभरणी केली.संविधानात्मक हक्का सोबत कर्तव्याची अंमलबाजवणी महत्वाची आहे.
भारताचे संविधानाचे तत्वज्ञान,मूल्य,आदर्श व संविधान निर्मितीचा उद्धेश स्पष्ट करण्याकरिता संविधान प्रास्ताविक,उधेशिकेचे अन्यन्यसाधारण महत्व आहे ,तसेच भारतीय घटनेबाबत जागरूकता,,घटनात्मक अधिकार व कर्तव्याबाबत विध्यार्थाना जागरूकता करून दिली आणि संविधानाच्या उद्धेशीकेचे विध्यार्थानी सामूहिक वाचन करण्यात आले.
प्रत्येक नागरिकाला स्वत्रंत भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे,जागरूकता व्हावी आणि संविधानिक मूल्याचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो.
सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले,या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .
0 comments:
Post a Comment