Ads

"ऑपरेशन मुस्कान" मुळे मिळाले 210 पालकांचे ओठावर हसु...

चंद्रपुर :-दिनांक १ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील वेगवेगळया पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता व पळविलेली मुले, मुली तसेच बेपत्ता महिला व पुरुषांच्या शोधासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात "ऑपरेशन मुस्कान" "Operation Muskaan" मोहिम राबविण्यात आली.
"ऑपरेशन मुस्कान" या विशेष मोहिम करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथक नेमण्यात आले.
"Operation Smile" brought smiles to parents' faces...
"ऑपरेशन मुस्कान” या विशेष मोहिमे दरम्यान जिल्हयातील पळविलेल्या मुले, मुली पैकी १ मुलगा आणि ५ मुलीचा शोध घेवुन त्यांच्या आई-वडील, कायदेशीर पालकांचे स्वाधिन करण्यात आले आहे.

तसेच बेपत्ता झालेल्या महिला व पुरुष पैकी १३३ महिला आणि ७१ पुरुष असे दिनांक १ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ पावेतो जिल्हयात एकुण २१० मुले, मुली आणि महिला व पुरुषांचा शोध घेण्यास चंद्रपूर जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

विशेषतः या विशेष मोहिम दरम्यान सन २०१६ व २०१७ मधील हरविलेले दोन तरुणींचा शोध घेण्यास यश आले आहे.

सदरची मोहिम अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी समवेत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिनस्त विशेष पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment