बल्लारपूर : भूमिपुत्र ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 20 डिसेंबर रोजी पाण्याच्या मुख्य समस्यांबाबत उपविभागीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील नळांमध्ये घाण पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे, त्यामुळे पाणी शुद्ध करून पुरवठा करण्यात यावा, 15 युनिट नळाचे बिल ₹ 300 वरून ₹ 100 करण्यात यावे आणि युनिट चार्ज ₹ 10 करण्यात यावा. बल्लारपूर शहरात 2 वर्षांपूर्वी प्रत्येक घरात नवीन मीटर बसविण्यात आले होते, मात्र अनेक घरांमध्ये मीटर सदोष असल्याचे आढळून आल्याने त्यांना 616 रुपयांचे बिल पाठविण्यात आले असून, ते 210 रुपये करण्यात यावे. अनेक जुने नळ कनेक्शन बंद असतानाही ग्राहकांना नळाची बिले पाठवली जात आहेत. ती बिले माफ करावीत. नवीन कनेक्शनसाठी ₹ 3500 आकारणे आणि टॅप पाइपलाइन मीटरसाठी ग्राहकांकडून स्वतंत्रपणे शुल्क आकारणे तात्काळ थांबवावे आणि नवीन कनेक्शन ₹ 500 मध्ये दिले जावे. विभागाकडे नोंदी असूनही वीज जोडणी किंवा कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनेक वर्षांपूर्वीची डिमांड कॉपी मागते, लोकांना त्रास देऊ नका आणि कोणतेही शुल्क न घेता नळ कनेक्शन द्या.
या प्रश्नांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भूमिपुत्र ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बल्लारपूर भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे, ताहेर हुसेन, साजिद शेख, अतिक शेख अमोल वर्मा, बशीर खान यासीर, शुभम, सिराज शेख, शाहिद खान, रागिणी, सानिका, लता नागौसे, पूजा मोहुर्ले उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment