वरोरा सादिक थैम :- नागपूर महामार्गावरील टेमूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे चारच्या सुमारास झाला.
टेमूर्डा येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम आहे. हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता.आज पहाटे चारच्या सुमारास काही दरोडेखोर या एटीएम मध्ये शिरले. आपली सीसीटीव्ही मध्ये नोंद होईल या भीतीने यांनी सर्वप्रथम सीसीटीव्हीच्या कॅमेरावर काळा स्प्रे मारला. त्यामुळे त्यांच्या एटीएम मधील पुढील हालचालींची नोंद होऊ शकली नाही.मात्र या एटीएम मधून रक्कम लंपास करण्यात हे दरोडेखोर यशस्वी होऊ शकले नाही.
या संबंधात महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक सिद्धांत नगराळे यांनी वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून या संबंधात दरोडेखोर यांनी हा प्रयत्न केला आहे.हे दरोडेखोर कारने आले असल्याची नोंद सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.
0 comments:
Post a Comment