Ads

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

जावेद शेख भद्रावती :-घरी कोणी नसताना २१ वर्षीय तरुणीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडली. साक्षी पांडुरंग मोंढे 21 असे मृत तरुणीचे नाव आहे. साक्षी ही चिरादेवी येथील रहिवासी आहे.
Girl commits suicide by hanging
साक्षी मोंढे मंगळवारी सायंकाळी चिरादेवी गावातील तिच्या घरी एकटीच होती. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत साक्षीने घराच्या स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाहेरगावी गेलेले कुटुंबीय परत आले असता त्यांना साक्षी लटकलेली दिसली. मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच पालकांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा दाखल केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment