भद्रावती जावेद शेख:-गेल्या दीड ते दोन महिन्या पासून तालुक्यातील बरेच आधार केंद्र हे विविध कारणासाठी बंद असून, आधार साठी सामान्य नागरिकांची फार वणवण होत असून, प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
साध्य शालेय विद्यार्थ्यांना APPAR Id करिता आधार अपडेट, लहान बाळांची नवीन नोंदणी, विवाहित महिलांचे आधार अपडेट, राशन लाभार्थ्यां चे हाताचे ठसे, पेन्शन धारकांची वयोमानाप्रमाणे आधार अपडेट ची आवश्यकता असून, तालुक्यातील अश्या नागरिकांची व विद्यार्थ्यां ची वणवण होत आहे गावातील व आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिक विद्यार्थी हे आधार केंद्रात भेट देऊन खाली हाताने परत जात आहे परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही आधार केंद्र संचालकाला याबाबत माहिती विचारली असता सदर केंद्र हे प्रशासनस्थळावरून बंद असून प्रशासनाची संमती मिळाल्यानंतरच केंद्र हे पूर्ववत सुरू होईल अशी माहिती मिळत आहे तरी सदर प्रशासनाने नागरिकांच्या समस्या कडे लक्ष केंद्रित करावे
0 comments:
Post a Comment