Ads

शिबिरात ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सादिक थैम वरोरा : शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.८ डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
45 blood donors donated blood in the camp
शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब वरोरा अध्यक्ष बंडू देऊळकर, रोटेरिअन विजय पावडे, शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धिरज लाकडे, मंगला डांगरे सदस्य, सरकारी रक्तपेढी चंद्रपूर चे अधीक्षक पंकज पवार आणि उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील डॉ.स्वाती देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व आणि या उपक्रमाच्या गरजेवर प्रकाश टाकला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश चंगडिया (अध्यक्ष, माहेश्वरी समाज वरोरा) , डॉ. प्रफुल्ल खुजे सर (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय वरोरा), रत्नमाला लाकडे (सहसचिव, शेषरत्न बहुउद्देशीय संस्था), सतिश डांगरे, कीर्ती कातोरे, प्रतिभा ढगे, किरण ढेंबरे, आदर्श आस्कर, अभिजित मणियार (सचिव, रोटरी क्लब वरोरा), राम लोया, अमित लाहोटी, अमित नाहार, सचिन जिवतोडे यांच्यासह शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि रोटरी क्लब वरोरा यांनी सहकार्य केले. याप्रसंगी
रक्तदान हे जीवनदान असल्याचे अधोरेखित करून शिबिराद्वारे युवक-युवतींना आणि समाजातील विविध घटकांना रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्यात आले. या शिबिराद्वारे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये साठवणूक वाढवण्याचा उद्देश होता.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बंडू देऊळकर यांनी, “रक्तदान ही मानवतेची सेवा असून त्याद्वारे जीवन वाचवण्याचा सर्वोच्च आनंद मिळतो,” असे मत व्यक्त केले. धिरज लाकडे यांनी संस्थेच्या वतीने नियमितपणे असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, तसेच रक्तदाते यांची उपस्थिती लाभली. रक्तदानातून समाजातील गरजू रुग्णांना नवी उमेद मिळेल अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल अजूनही काही समाजघटकांमध्ये गैरसमज आहेत. या शिबिराने या गैरसमजांना दूर करत रक्तदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण केला गेला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment