Ads

शेतकरी मित्रांना कायम करून , मानधनात वाढ करण्याची शेतकरी कृषिमित्र संघटना भद्रावतीची मागणी

जावेद शेख भद्रावती :- शेतकरी मीत्र मागील १५ वर्षापासुन कृषी विभागा अंतर्गत काम करीत आहेत. कृषी विभागाच्या प्रत्येक योजना व माहिती सभा आम्ही गावातील प्रत्येक शेतक-या पर्यंत पोहचवत असतात व वेळोवेळी कृषी अधिकारी यांनी दिलेली माहिती व मिळणारा लाभ शेती विषयक सल्ला देण्याचे कार्य करतात.
Farmers' Krishimitra Sanghatana Bhadravati demands to retain farmers' friends and increase their honorarium
परंतु मागील १५ वर्षापासुन कार्य करीत असताना सुध्दा त्यांना मानधन फक्त ५०० रूपये महिना व ते आता काही महिण्यापासून १००० रू. मिळत आहे. परंतु १००० रू. महिण्यामध्ये दर महिन्याला तालुकाची मिटींग मध्ये जाण्या येण्यात खर्च होतात. त्यांच्या परिवाराचा विचार करूण मानधनात ५००० रू. करण्यात यावे व तसेच जे मागील १५ वर्षापासुन शेतकरी मित्र म्हणुन कार्यरत आहेत त्या शेतकरी मित्र कायम स्वरूपी ठेवण्यात यावे.

दि. ०५/१२/२०२४ ला तहसिलदार साहेब यांच्या पत्रानुसार दि. १०/१२/२०२४ ला आयोजीत केलेल्या प्रशिक्षण नुसार ई. पिक पाहणी हंगाम (रब्बी) २०२४-२५ नोंदणी करिता शेतकरी मीत्राची निवड करण्यात आली असुन इ. पिक पाहणी नोंद प्रति खातेदार ५ रू. प्रमाणे प्रशिक्षण मध्ये ठरविण्यात आले. तरी ते ५ रू. आम्हाला मान्य नसुन आमच्या मानधनात ५००० रू. महिना करण्याची मागणी शेतकरी कृषीमित्र संघटना भद्रावती ने तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment